पडसाद: हिंदीत शपथ घेतल्याबद्दल सपातर्फे अबू आझमी यांचा सत्कार

हिंदीत शपथ घेतल्याबद्दल सपातर्फे अबू आझमी यांचा सत्कार


लोकसत्ता या वृत्तपत्रात आज, दिनांक १५ नोव्हेंबर २००९ रोजी प्रसिद्ध झालेली ही छोटीशी बातमी:

लखनौ, १४ नोव्हेंबर / पीटीआय

विधानसभेत राष्ट्रभाषा हिंदीत शपथ घेतल्याबद्दल समाजवादी पार्टीतर्फे त्यांचे महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष आणि नवनिर्वाचित आमदार अबू आझमी यांचा सत्कार करणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आव्हानाला झुगारून आझमी यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत ९ नोव्हेंबरला हिंदीतून शपथ घेतली होती. त्याबद्दल मनसेच्या १३ आमदारांचा प्रसादही त्यांना खावा लागला होता. मनसेच्या आक्रमक आमदारांना न जुमानता हिंदीतून शपथ घेतल्याबद्दल समाजवादी पाटीतर्फे १७ नोव्हेंबरला त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी आज येथे दिली. लखनौ येथील समाजवादी पार्टीच्या मुख्यालयात हा सत्कार सोहळा होणार असून, पक्षाचे प्रमुख मुलायमसिंग यादव आणि राष्ट्रीय सरचिटणीस अमर सिंग उपस्थित राहणार आहेत.

या बातमीचा मूळ दुवा येथे आहे.

शपथ महाराष्ट्रात घेतली, मग सत्कार लखनौमधे का?

4 प्रतिक्रीया - Comment:

sudhirkeskar Thursday, November 19, 2009 10:03:00 PM GMT+05:30  

समाजवादी पक्षाचे हे तिन्ही पुढारी महाराष्ट्र द्वेष्टे आहेत. आजकीय स्वार्थासाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हेच योग्य.

कांचन कराई Friday, November 20, 2009 1:38:00 PM GMT+05:30  

त्यांच्या एका कृतीकडे दुर्लक्ष करता येईल. मात्र त्यांच्या कृती महाराष्ट्र द्वेष्ट्या असल्यानेच खबरदारही रहावं लागतं.

sudhirkeskar Friday, November 20, 2009 7:20:00 PM GMT+05:30  

होय तेही बरोबरच आहे. मराठी माणसानी आपापसातील मतभेद दुर करुन एक्जुट दाखवली तरच हे साध्य होईल.
परंतु ते शक्य होईल का? कारण ्राज व उध्दव ह्या दोघंची तोंडे दोन दीशेला आहेत.

कांचन कराई Friday, November 20, 2009 7:32:00 PM GMT+05:30  

हेच तर दु:ख आहे. दोन मराठी नेते. समान विचारसरणी असूनही आज त्यांच्यात तेढ आहे. त्यांच्यातील फुटीचा परिणाम निवडणूकीत पहायला मिळाला. आज राज आणि उद्धव एकत्र आले तर इतर पक्षांना आपल्या धोरणांचा फिरून विचार करावा लागेल.

Text Widget

www.Blogwani.com

Recent Comments

  © Free Blogger Templates Blogger Theme by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP