ओह! हा विचार खूप भयानक आणि अंगावर शहारे आणणारा आहे.....

.......हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटेंसारखे अधिकारी एकाच हल्ल्यात शहीद होतात......

............मालेगाव बॉम्बस्फोटाची चौकशी सुरू झाली होती...

...............आमचे नेते ह्या अतिरेकी हल्ल्याच्या घटनेबाबत पराकोटीचे उदासीन आहेत...............

.........साक्षीदार नष्ट करण्यासाठी तर नव्हतं ना केलं हे सर्व....? .......?

..............खरंच, असा देशद्रोह कुणी केला असेल तर??

2 प्रतिक्रीया - Comment

  1. Anonymous // Tuesday, December 2, 2008 2:11:00 AM IST  

    काहीही काय. तूम्ही बातम्या वाचत नाहीत का?

  2. Kanchan Chavan // Tuesday, December 2, 2008 6:22:00 AM IST  

    मी हा विचार म्हणूनच मांडला आहे. ह्या बातम्या आपल्या पर्यंत कोण पोहोचवतं? आबांसारखा वाघ नेता गेल्या दीड दोन वर्षान अचानकपणे शेळपटासारखा वागू लागला, विलासराव गुलछबू म्हणून प्रसिद्ध असले तरी, ते आपल्या मुलाला आणि त्या रामूला ताज पाहायला घेऊन जाण्याइतके बिनडोक आहेत? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडून राजीनाम्याशिवाय कशाचीही मागणी केली जाउ शकत नाही, हे न समजण्याएवढे असंजस ते नक्कीच नव्हते.

    अतिरेक्यांची संख्या बुधवारपर्यंत 25 होती, मग ती 20 वर आली. 10-12 मेले, एक पकडला गेला, बाकीच्यांचं काय? कोणता आकडा खरा मानायचा? आपली लोक मेली, त्याचाही निश्चित आकडा माहीत नाही. आबा म्हणत होते, त्यांच्याकडे पाकिस्तानकडे बोट दाखवण्याइतपत पुरावे आहेत, मग त्यांनी ते राजीनामा देण्याआधी भारतीय जनतेसमोर ठेवायला हवे होते. नुसता दोन ओळींचा राजीनामा खरडून द्यायला ही काय उडप्याच्या हॉटेलमधली वेटरची नोकरी आहे का?

    दिवंगत पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांनी मालेगाव बॉम्ब स्फोट केस सोडवली होती. त्यात एका साध्वीचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं. एका साध्वीचं नाव बॉम्बस्फोटासारख्या संवेदनशील विषयात गुंतूच कसं शकतं? चौकशी सुरू होण्याआधी करकरे साहेबांना सर्व शिव्याशाप देऊन हे राज्यकर्ते मोकळे झाले आणि आता हेमंत करकरे व अतिरेक्यांचा काळ समजले जाणारे दोन महत्वाचे पोलिस अधिकारी शहीद होतात, तेही एकाच दिवशी ?

    देश माझा आहे, 26 तारखेला माझ्या देशात जे काही झालं, त्याचे पडसाद सा-या जगातून येताहेत. 'बातम्या' वाचल्यानंतर तर, मला ह्या दॄष्टिकोनातून विचार करण्याची गरज असलीच पाहिजे, असं मला वाटतं.