कटाक्षाने मराठीतच बोला
कटाक्षाने मराठीतच बोला
|
महाराष्ट्रात मराठी व्यतिरिक्त इतर कुठल्या भाषेत संवाद साधणं किंवा मराठी न येणं हा मुद्दा गैर असूच शकत नाही. तरीही विचार करायला हवा की प्रत्येक राज्यात आपापल्या राज्यभाषेला प्राधान्य देतात. जर संभाषणात अडचण येत असेल, तरच इतर भाषेचा पर्याय समोर ठेवला जातो. जसं ह्या ध्वनिफितीमधेही राजेंद्र नावाचे गृहस्थ सांगत आहेत की ते बंगालमधे असताना, आधी बंगाली माणूस त्यांना विचारतो की "बंगाली येतं का?" सुदैवाने त्यांना बंगाली येत असल्याने त्यांनी बंगालीतून संवाद साधला. मात्र, असं महाराष्ट्रात होतं का? महाराष्ट्रात अमराठी व्यक्तीशी बोलायचं आहे म्हटल्यावर मराठी माणूस स्वत:च हिंदीत संवाद साधू लागतो, मग अमराठी लोकांना तरी का दोष द्यायचा? हेच अमराठी इतर प्रांतात गेले की ताबडतोब तिथली संस्कृती आपलीशी करतात, कारण ’परभाषा हा एक पर्याय असतो, प्राधान्य नाही,’ हे त्यांना तिकडे गेल्यावर बरोबर समजतं. इकडे आपण त्यांना ही जाणीवच कधी करून दिली नाही.
कॉल सेंटरमधे ग्राहक जे बोलतात (अर्थात वाट्टेल ते नाही) ते ऐकून घ्यावेच लागते. त्या गृहस्थाचे बोलणे ऐकून घेताना, त्या मुलीचा कॉल AHT किती वाढला असेल; शिवाय तिचा नाईलाज असतानाही तिला जे ऐकावं लागलं, त्यामुळे तिच्या टी.एल. ने तिला किती सुनवलं असेल, मी याचा विचार करत होते. केवळ मराठीतून सुरूवात न झाल्याचं निमित्त होऊन ही जी ध्वनिफित बनली, ती त्या कॉल सेंटरमधून बाहेर येऊन आपल्या सर्वांना ऐकण्यासाठी उपलब्ध झाली आहे. पलिकडून बोलणारी व्यक्ती मराठी बोलतेय, हे कळल्यावर त्या मुलीने ताबडतोब मराठीतून बोलायला सुरूवात केली. तिची खरंच काही चूक नव्हती. चूक असेलच तर ती कंपनीची आहे. त्यांनी संवादाचा उतारा हिंदीतून तयार केला आहे. मात्र, ही ध्वनिफित त्या फोन कंपनीसाठी एक चांगला धडादेखील आहे.
व्होडाफोन या कंपनीने मराठीतून संवादाची सुविधा उपलब्ध केल्याचंही मला आज समजलं. तिसरा पर्याय तिथे मराठीचा आहे. मला आनंद झाला. आता हाच तिसरा पर्याय, "पहिला करा", असं म्हणून मी जर वाद घालायला लागले तर ते निश्चितच अतिरेकीपणाचं होईल. ’मराठी लोकांच्या सूचनेवरूनच व्होडाफोनने आपली सेवा मराठीतून पुरवण्यास सुरूवात केली आहे’ असं मला समजलं. ज्या ग्राहक-सेवा प्रतिनिधीशी बोलले त्याच्या बोलण्याच्या शैलीवरून तो अमराठी होता हे समजत होतं पण मी मराठी पर्याय निवडल्याने त्याला मराठीतून बोलावं लागलं आणि तो खरोखरंच खूप चांगलं मराठी बोलत होता. कॉल सेंटरसारख्या ठिकाणी पर्याय निवडता आल्याने मी मराठी बोलू शकले, याचाच अर्थ ’हे करता येतं पण करायचं नसतं’. "सूचना" आली की होतं.
मराठीप्रेमाचा बहर आला की मराठेतर भाषा अडाणी वाटण्याचं काहीच कारण नाही. मराठी जर मातृभाषा असेल, तर हिंदी देखील कुणाची तरी मातृभाषा असणार ना! माझ्या आईचा अपमान तो अपमान आणि दुस-याच्या आईचा अपमान, ती करमणूक असं कसं असेल? मात्र, हीच गोष्ट मराठेतर व्यक्तींनाही लागू पडते. "मराठी नही आती, हिंदी में बात करो" असं एखाद्या उत्तर भारतीयाने सांगितल्यावर हिंदीत बोलण्यास मराठी माणसाची ना नसते, मात्र मराठी समजत नसल्याचा बहाणा करून उत्तरभारतीय विनाकारण आपली अडवणूक करत आहे, हे लक्षात आल्यावर मराठी माणसाला रागही येऊ नये?
ओघाओघाने आठवलं आहे म्हणून लिहिते. काही वर्षांपूर्वी आमच्या शेजारी उत्तर भारतीय कुटुंब रहात होतं. आमच्यात हा अलिखित करार लहानपणीच झाला होता- ते आमच्याशी मराठीत बोलायचे आम्ही त्यांच्याशी हिंदीत बोलायचो. परिणामी आमचं हिंदी आणि त्यांचं मराठी एकदम पक्कं झालं. मराठी-अमराठीचा मुद्दा तेव्हा उपस्थित झाला नव्हता. ’त्यांची भाषा आपल्याला आली पाहिजे’, इतकाच हेतू दोघांच्याही मनात होता. हाच विचार महाराष्ट्रात येणारे सर्व उत्तर भारतीय करत नाहीत आणि मराठी माणूसही करत नाही. उद्या मी जर उत्तर भारतात रहायला गेले तर त्यांना कौतुक वाटावं इतकं अस्खलित भोजपुरी आणि शुद्ध हिंदी बोलू शकते. पण मला कानडी येत नाही. मात्र कर्नाटकात रहायला गेले तर "कानडी येत नाही" असं म्हणत रहाण्यापेक्षा कानडी शिकणं मला आवडेल. थोडा वेळ लागेल पण मी शिकेन. कारण राज्याची भाषा केवळ संभाषणासाठी नसते, तर ती बोलताना, ऐकताना आपल्याला त्या राज्याची संस्कृती व तिथल्या स्थानिक लोकांची जीवनशैली व व्यक्तींचे स्वभाव कळण्यास मदत होते. ह्याच उत्तर भारतीय कुटुंबातील मावशींनी एकदा, "बर्तन मॉंजने जा रही हूँ," असं म्हटल्यावर ते माझ्या आईला कळलं नाही, म्हणून त्या मावशींनी "भांडी घसने जा रही हूँ" असं मराठी-हिंदीतून सांगितल्यावर ते आईला लगेच कळलं. आईही त्यावेळेला हिंदी शिकली असती तर तिला या भाषांतराची गरज पडली नसती. हिंदीमधे गांडूळाला ’केंचूँवा’ व रातकिड्याला ’झिंगूर’ असं म्हणतात, हे मला समजलं कारण मी हिंदी शिकले. हेच मी उत्तर भारतातही केलं असतं ना! भाषा शिकणं ही सहज, शब्दश: बोलता बोलता साध्य होणारी गोष्ट आहे. महाराष्ट्रात रहाणारे मारवाडी, पंजाबी हे जर मराठी बोलू शकतात तर उत्तर भारतीयही बोलू शकतात.
दुर्दैवाने ही गोष्ट खरी आहे की आपल्या राज्यात अधिकाराच्या जागा भूषवणा-या लोकांनी भ्रष्टाचार केल्यामुळे परप्रांतियांना महाराष्ट्रात बस्तान ठोकण्यास मोकळे रान मिळाले आणि दुर्दैवाने ही गोष्ट देखील खरी आहे की ते लोक मराठी आहेत. अशी लोकं महाराष्ट्रातून संपलेली नाहीत. ही ध्वनिफित म्हणा, ईमेल म्हणा, लेख म्हणा, मराठीचा पुरस्कार करणा-या चळवळीचा भाग आहेत. लढा ही एका दिवसात संपणारी गोष्ट नाहीच पण आपणच कबूल करायचं की आपण मराठीला प्राधान्य दिलं नाही आणि आपणच म्हणायचं की आता बदलायला हवं. पण म्हणजे काय करायला हवं? मनातला विचार कृतीत आणण्यासाठी त्या विचाराचा प्रसार होणं गरजेचं आहे ना! त्यासाठी ही चळवळ. ज्यांना हे ईमेल मिळालं, ते कदाचित सुजाण असतील पण त्यांच्या ओळखीत अशा काही व्यक्ती असू शकतात ज्यांना अजूनही मराठीची चळवळ मान्य नाही, त्यांच्यापर्यंत हे विचार पोहोचावेत म्हणून हा सगळा खटाटोप. दुस-याची रेघ आपल्या रेघेपेक्षा लहान दिसायला हवी असेल, तर त्याची रेघ पुसण्यापेक्षा आपली रेघ मोठी करावी म्हणजे जोडे मारण्याची गरजच उरत नाही.
मराठीचा प्रचार, प्रसार, मराठीतील कृती ही काही एका राजकीय पक्षाची मक्तेदारी नाही. जो मराठी आहे, ज्याला जाण आहे, तो प्रत्येकजण या चळवळीत सामील आहे. मुळात महाराष्ट्रातच मराठीसाठी चळवळ करावी लागणं, हे एक दुर्दैव आणि मराठीच्या मुद्दयाला तापला तवा समजून त्यावर आपली पोळी भाजून घेणारे सत्ताधारीही मराठीच आहेत, हे दुसरं दुर्दैव!
Read more...